माझ्या डोळ्यांत तुझी छवी
मी तुला रोज पाहतो नवी
किती तपांची ही आराधना
की तुझ्यासाठी अखंड तपस्या..
अहोरात्र मला तुझेच ध्यान
नाही आता कसले भान
कधी फळेल माझी साधना
कधी सुटेल माझी समस्या ..
काळोख किती हा दाटला
जणू रात्रीचा जीव फाटला
पुनवेची रात तू मागना
नि संपू दे ही अमावस्या ..
--जय