Author Topic: कसा राहू तुझ्याशिवाय?  (Read 1949 times)

Offline Jai dait

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
कसा राहू तुझ्याशिवाय?
« on: September 13, 2010, 11:19:59 AM »
कसा राहू तुझ्याशिवाय
एक क्षण ही असा जात नाही
जेव्हा तुझी आठवण येत नाही

पण तू मला दिलं काय?

फक्त तुझ्या आठवणी
ज्या छळतात मला क्षणोक्षणी
 
दिल्यास फक्त जखमा
ज्या हृदयात केल्यात जमा
 
संपता न संपणारी रात्र
जी उसासे भरते मात्र
 
या आयुष्याच्या तराजूत
तू दिलेल्या दुःखाचंच पारडं जड आहे,
तरीही तुझ्याशिवाय जगणं अवघड आहे...

  --जय
« Last Edit: September 13, 2010, 11:20:27 AM by Jai dait »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline udaychandanshive

  • Newbie
  • *
  • Posts: 6
Re: कसा राहू तुझ्याशिवाय?
« Reply #1 on: September 14, 2010, 09:39:14 PM »
so cool yar

todlas re mitra todlas :-* :-*