Author Topic: बर्‍याच दिवसांनी तिचा फोन आला  (Read 2383 times)

Offline swapnilb17

 • Newbie
 • *
 • Posts: 10
बर्‍याच दिवसांनी तिचा फोन आला
उचलताना माझा काळजाचा ठोकाच चुकला

"काय रे आजकाल फोन येत नाही तुझा
कुणी दुसरं भेटलं म्हणून विसरलास का मला?"


"तू असं म्हणावं याचं मला नवल वाटतं
तुझ्या मनात नेमकं काय आहे हेच कळत नाही.

फोन केला तर कधी स्पष्ट बोलत नाही
नाही केला तर म्हणते मी का तुला आवडत नाही?

ते सोड......
आज कसा फोन केला ते तर सांग."


"काही नाही रे......
जरा मन मोकळं करावसं वाटलं.
तुझ्याशिवाय दुसरं कोणी जवळचं नाही वाटलं

एक प्रश्न पडलाय.....
ज्याच्यावर प्रेम करते; त्याला कसं सांगू?
तू माझा खास मित्र ना?
मग तूच काहीतरी उपाय सुचव पाहू."


"मी काय सांगू?
माझीच व्यथा मी तुझ्या तोंडून ऐकतोय
तुझं आणि माझं घोडं एकाच ठिकाणी अडलंय."


"अरे तु काय बोलतोय मला काहीच कळत नाही आहे."


"हेच तर मी तुला पहील्यापासून सांगतोय
माझ्या बोलण्याचा अर्थ तुला कधीच नाही कळला
कळला असता तर मग असा प्रश्नच नसता पडला!!!!"

-स्वप्निल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline anolakhi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 79
 • Gender: Male
  • http://www.durava.blogspot.com
It happens wid me...just yesterday...strange coincidence

Offline swapnilb17

 • Newbie
 • *
 • Posts: 10
really??
« Last Edit: September 14, 2010, 10:26:44 AM by swapnilb17 »

Offline chetan (टाकाऊ)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 86
 • Gender: Male
असच घडत ..... बरोबर आहे मित्रा
पण तू सांग तिला समजवून
अरे त्यांना कळत पण वळत नाही

आणि तिला नक्की कळेल

Offline justsahil

 • Jr. Member
 • **
 • Posts: 50
 • Gender: Male
come on dude...just tell her.
पण फोनवरूनच सांग.....तिला नक्की कळेल आणि वळेल सुद्धा.
आणि याची प्रत्यय  फोनेच्या  बिलात......तुला कळेल.......
 :D :D :D :D

Offline mayamamta

 • Newbie
 • *
 • Posts: 11
Hi, really nice one ............keep it up  by the way its better to with her quikely otherwise it will be too late.............take care#####waiting for next poem

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
chhan ahe

Offline ganesh3235

 • Newbie
 • *
 • Posts: 1
तुझ्या भावना ती समजून घेईल हीच तुझ्या या कवितेची खरी कमाई

Offline dancydeer

 • Newbie
 • *
 • Posts: 10
are mitra...apratim kavita aahe...majhyasobat sudhha haach khel suru aahe re....kharach khup tras hoto tichya ashya waagnyacha...

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
mitra far chan aahe kavita