Author Topic: आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.  (Read 1315 times)

Offline rajeshgurav

  • Newbie
  • *
  • Posts: 2
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला
आपणच आवरायचं असतं....

...आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च
प्रेम नसतं
आकर्षणाचं
स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा
केव्हा दिसतं...

पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन्

आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच

त्याला आवरायचं
अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच
आवरायचं असतं.