पहिला पाऊस
आमची पहिली भेट
ती आडोशाला उभी
मी तिच्या बाजूला
तिचा तो त्रासिक चेहरा
आणि माझं मिश्कील हास्य
अचानक ओळख निघणं
एकत्र छ्त्रीत जाणं
तिचं ते भिजल्यानं कुडकुडणं
अन् माझं तिच्या स्पर्शानं शहारणं
तिचं घर येणं
मला निरोप देणं
यावेळी, तिचा तो हसरा चेहरा
आणि माझं उसनं हास्य
-स्वप्निल