आता गझल कशाला?
साठीस दोन बाकी, अंगास कंप आला
त्या गत यौवनाची, चर्चा आता कशाला?
नजरेस साद असता, प्रतिसाद नाही आला
अंगाई गात असता, मग प्रेम गीते कशाला?
आषाढ श्रावणान्चा ना स्पर्श अंगी झाला
ग्रीष्मातल्या दुपारी, मग मेघ-चर्चा कशाला?
मैफिल संपलेली, अस्तास सूर्य आला
नि:शब्द ओठ असता, आता गझल कशाला?
-ashok