तु - असतांना तु - नसतांन
माझ्या जगण्याला अर्थ आहे, तु असतांना !
माझे जगणे व्यर्थ आहे, तु नसतांना !!
माझ्या घराला घरपण आहे, तु असतांना !
माझ्या घरात कालोख आहे, तु नसतांना !!
माझ्या संसाराचे धागे - दोरे अजोड आहे, तु असतांना !
माझ्या संसाराला जोड नाही, तु नसतांना !!
माझ्या स्वप्नाला रूप आहे, तु असतांना !
माझ्ये स्वप्न कुरूप आहे, तु नसतांना !!
मला तुझी काळजी आहे, तु असतांना !
मला तुझी चिंता आहे, तु नसतांना !!
असा मी पूर्ण - अपूर्ण आहे, तु असतांना - नसतांना !
:- Roshan Supe Nagpur M.S.