का कधी कुणी कुणासाठी काही करतं का?
आपल्या जगण्यासाठी कुणी कधी मरतं का?
ज्याला आपण आपलं सर्वस्व देऊन जातो
त्याच्याकडे आपल्यासाठी काही उरतं का?
दोन घडीच्या मिलनाची आस हृदयात ठेवून
तुझं मन कधी माझ्यासाठी झुरतं का?
बहाल केलं सारं जग तुझ्या प्रेमासाठी
तुला माझ्यासाठी स्वत:चं जग विसरतं का?
किती भरले उसासे, एकाकी रात्रींना
आठव जरा, तुला कधी ते स्मरतं का?
आज तू जवळ नाहीस, पण विचार मनाला
तुझी वाट बघण्यासाठी एक आयुष्य पुरतं का?
--जय