कां जीव घाबरावा ?
कांट्यास पार करता, नव्हत्या पदी चढावा
मज हार आज मिळता, कां जीव घाबरावा?
ओठात ना कधी ही, माझ्या गीतास जागा
साथीस स्वर येता, कां जीव घाबरावा ?
केला प्रवास सहजी, मी उंच पर्वतांचा
येता उतार आता, कां जीव घाबरावा ?
मी तप्त त्या उन्हांचा, गेलो न सांवलीला
येता पहाटवारा, कां जीव घाबरावा ?
युद्धात ना कधीही, मृत्युस पाठ दिसली
येता सुखान्त आता, कां जीव घाबरावा ?
-अशोक