आस नसतांना तिचं असं येणं आयुष्यात
वळवाचा पाऊस आला तपत्या उन्हात
तिला पाहून वाटलं बोलावं काहीतरी
डोळे बोलले जशी नजरा नजर झाली क्षणभरी
पुढल्या काही दिवसात दिसली ती अनेकदा
हे घडत होतं कि कोणी घडवत..विचार आला कितीदा
नाव शोधण्यासाठी आता करू लागलो धावपळ
तिला थांबवून विचारावं पण मनात नव्हतं बळ
ती कुठे रहाते, काय तिला आवडतं किती ते प्रश्नं
उत्तरं शोधावेसे वाटे , वेळ काळापासून झालो अनभिज्ञ
माझ्या विश्वात असूनही तिच्यात हरवलो होतो
तीही मला शोधत असेल समजून खुदकन हसत होतो
पाहत होतो इतरांना फुल देतांना इतक्यात पाठीवर पडली थाप
माझ्या हातात होता पिवळा आणि तिच्या होता लाल गुलाब....