ती वचने सारी
ती वचने सारी...कुठे हरवली कळले का
दिल्या घेतल्या शपथांचे काही स्मरले का
ओघळून जाई दव थेंब जसा पानावरूनी
प्रेम मनातले कसे सहजी असे ढळले का
ठोकताळे जगण्याचे सारे आखीव रेखीव
अचानक भावनांच्या या वरचढ ठरले का
लखलाभ होता सुख ऐश्वर्य ज्याचे त्याला
पर्वा करी उगा कोणी मनातून चुकले का
काय घडेल उद्या? अवचित कुणी सांगावे
सहजच मांडतो शिव येथे कुणा पटले का
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९