मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, प्रेमाच्या अनोख्या भाषेची कविता-गीत ऐकवितो. "बाग़ों में बहार है?, कलियों🌹 पे निखार है?, तुमको मुझसे प्यार💘 है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही रविवार-रात्र आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे- (बाग़ों में बहार है?, कलियों पे निखार है?, तुमको मुझसे प्यार है)
-----------------------------------------------------------------------
"माझं तुझ्यावर प्रेम💘 आहे, तुला ते कळलंही आहे !"
-----------------------------------------------
माझं तुझ्यावर प्रेम आहे, 💘
तुला ते कळलंही आहे !
पुन्हा पुन्हा असं विचारू नकोस,
कळून न कळल्यासारखं वागू नकोस.
माझं तुझ्यावर प्रेम आहे, 💘
तुला ते कळलंही आहे !
ते काही सांगून कळतं नाही,
एकचं प्रेम कटाक्ष पुरेसा होई.
बघ, बाग कशी फुललीय, डवरलीय
बहराने कशी ती बहरून आलीय
आणखी तुला काय खाणाखुणा सांगू ?
आणि काय प्रेमाची निशाणी तुला दाखवू ?
कळ्यांची सुंदर फुले झालीत 🌹 🥀
फांद्यांफांद्यावर ती फुललीत, उमललीत 🍀
आपलही प्रेम असच फुलतंय, झुलतय,
अजूनही तुला का एखादं उदाहरण लागतंय ?
जा तिकडे, नको ना येऊस माझ्याकडे
तिरक्या नजरेने पाहू नकोस ना गडे
तुझ्या नजरेत प्रेम नाही, खट्याळपणाचं भरलाय,
तू त्यात असा काही बराच मुरलाय.
आता तर तू माझा हातही पकडू लागलास
बळेबळेच मला तू तुझ्याकडे ओढू लागलास
पण मी थोडंच तुला फशी पडणार ?
मी अशी थोडीच तुझ्या जाळ्यात फसणार ?
ते सर्व जाऊ दे, काही काळ राहू दे
इतर गोष्टी मला नंतर बोलू दे
तुझ्याकडून मला होकार आहे ना ?
माझा तुला स्वीकार आहे ना ?
नाही नाही नाही, अगदीच नाही
मला हे मुळीच मान्य नाही
मला बोलण्यात गुंतवतोस, मला भूल पाडतोस,
शब्दात पकडून माझ्या तोंडून वदवतोस.
तूच तर म्हणत होतीस, प्रिये
मी तुझ्यासाठी सर्व संकटे सहीन
तूच तर सांगत होतीस, सखे,
फक्त तुझ्याच मनात मी राहीन.
मला मान्य आहे, मी ते म्हंटलं होत
मला कबूल आहे, मी ते सांगितलं होत
तू मला आवडतोस, हे मात्र नव्हतं सांगितलं,
माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे नव्हतं म्हंटलं.
तू ज्याची वाट पाहत आहेस
तू ज्यासाठी इथे थांबला आहेस
तसं मुळीच घडणार नाही,
तसं बिलकूलही होणार नाही.
आता उगीच वेळ वाया घालवू नकोस
आता फुका तक्रार तू करू नकोस
एकदा शेवटचंच सांगून टाक तू,
माझ्यावर खूप प्रेम करतेस तू.
नाही नाही नाही, कितीवेळ सांगू तुला
माझं तुझ्यावर प्रेमच नाही
तू कितीही आर्जव केलास प्रेमाचा,
तरी मी तुला बधणार नाही.
बरं ठीक आहे, ते सर्व जाऊ दे
आपली कहाणी थोडी पुढे सरकू दे
बोलण्यात खूपच वेळ निघून गेला,
प्रेमाचा सारा उत्साहच नाहीसा झाला.
मला सांग, तुला कधी बेचैन वाटलंय ? 😒
मला सांग, तुझ्या मनात काही दाटून आलंय ? 😢
असेल, तर वेडे ही प्रेमाची निशाणीच आहे,
ही हुरहूर, ही तळमळ, हे प्रेमच सांगत आहे.
माझ्यावर तुझा विश्वास आहे ना ?
मी तुला आवडतोय ना ?
बघ, खोटं बोलू नकोस तू,
तुझ्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतंय ना !
नाही सांगितलंस तरी मी कळून चुकतोय
न सांगताच तुझा हावभावचं मला सांगतोय
तुझ्या नकारातच तुझा होकार आहे,
तुझा मला शेवटी होकारच आहे.
नाही नाही म्हणालीस, तरी ते होच आहे
तुझ्या लटक्या रागातच तुझा अनुराग आहे
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, 💕
मला ते न सांगताच कळलंही आहे !
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.03.2023-रविवार.
=========================================