Author Topic: ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं  (Read 1239 times)

Offline prachidesai

  • Jr. Member
  • **
  • Posts: 117
  • Gender: Female
ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...

unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline anolakhi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 79
  • Gender: Male
    • http://www.durava.blogspot.com
Really...कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...