तुझी एक झलक हवी आहे
मिलनाची आस रोज नवी आहे
चमचमणारी चांदणी मधेच लुप्त व्हावी
तशी तू अचानक हरपावी
तुजवीण मी ग्रहणातील रवी आहे
तुझी एक............................
दिसता तू मन माझ हरपून जाई
दुसरे सुचेना काही फक्त तुलाच पाही
कळेना मला तू कुठे कोणत्या गावी आहे
तुझी एक...........................
काळ्या भोर तुझ्या टपोर डोळ्यात
अडकलो तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
प्रेमवेडा मी एक कवी आहे
तुझी एक झलक हवी आहे.......................
तुझी एक झलक हवी आहे.......................
कवी: म.श. भारशंकर