Author Topic: ये ना सखे...  (Read 1120 times)

Offline prasad.deshpande1

  • Newbie
  • *
  • Posts: 1
ये ना सखे...
« on: October 07, 2010, 08:18:34 AM »
ये ना सखे...
----------------------------------------------------------------------------------------------------------------

मला पहिले मी तुझ्यात गडद,
पण का ग सखे दिसतो मी तुला तुझ्यात किंचित?
जरा बघ ना एकदा माझे काळीज
काजळा सारखे काळे असती
तरी दाखवे रूप तुझेच सुंदर...//१//

समज ना सखे तू या मनाची भाषा
अबोल असूनही ते बोलते पुष्कळ,
ऐकू येईल तुला पण शब्द त्याचे
जरा दे ना लक्ष्य तू त्याच्या नजरेवर....//२//


भावनेच्या विश्वात माझ्या शोधू पाहे मी माझे घर,
पण का ग सखे, दरवेळी सापडे मला तुझेच दार?
वाट हरवतो येता-जाता, पाय म्हणती लांब असे घरचे अंतर, 
सोडती मला तुझ्याच दारी, अन म्हणती ह्याविना ना गत्यंतर....//३//

आठवण तुझी करे आज मज हैराण,
अश्रू ढासळती डोळ्यातून भरपूर,
चिंब भिजले मन माझे त्यात
अंग फणफणती करुनी जीव कासावीस,
येना सखे दुरुनी परत
रंगवू गप्पा हसत खेळत,
क्षणभर मिळेल विश्रांती मज
मग ढळूनी जाईल त्या आठवणीत....//४//

- प्रसाद देशपांडे

Marathi Kavita : मराठी कविता