एका मुलाचे एका मुलीवर प्रेम असते पण मुलीच्या मनात काय आहे हे त्याला जाणून घ्यायचे असते आणि ते तो तिला कवितेच्यास्वरुपात प्रपोज करतो.
तुझा उन्हाळा माहित नाही.
तुझा हिवाळा माहित नाही.
तुझा जिव्हाळा माहित नाही.
शेवटी तुझीच तू, तू हि तुझेच.
तू तुझ्याच मनाची, मन हि तुझेच,
परंतु, मला नुसतं एवढंच वाटलं.
तुझ्या मनीचा पाऊस फक्त माझ्याकडे यावा.
उन्हाळ्याची थोडी उब आणि हिवाळ्याचा गारवा घेऊन.
नकोच नको भरभरून, नकोच सरसरून.
परंतु नक्कीच श्रावणासारखा खुलून.
हो, माहित आहे मला. पावसालासुद्धा अधिकार असतो.
कुठे बरसण्याचा तर कुठे न बरसण्याचा.
बरसलाच तर सोनं करीन.
अन नाही बरसलाच तर ,
चीरफटलेल्या जमिनीवर बसून ढगाकडे आवासून बघणारा शेतकरी होईन.
गणेश खोत.