Author Topic: पावसातील प्रेम कविता-ही रात्र पावसाळी, आहे आगळी, तुझ्या माझ्या मनाला करतेय खुळी  (Read 171 times)

Offline Atul Kaviraje

  • Hero Member
  • *****
  • Posts: 11,427
मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातील एक आगळी वेगळी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "सावन की रातों में, बातों ही बातों में,पागल दिल मस्ताना, होने लगा दीवाना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही तुरळक मळभ दाटलेली, पाऊस नसलेली, परंतु छान, गIर वारा वहIत असलेली, रविवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( सावन की रातों में, बातों ही बातों में,पागल दिल मस्ताना, होने लगा दीवाना )
--------------------------------------------------------------------------

           "ही रात्र पावसाळी, आहे आगळी, तुझ्या माझ्या मनाला करतेय खुळी"
          ------------------------------------------------------------

ही रात्र पावसाळी, आहे आगळी
तुझ्या माझ्या मनाला करतेय खुळी
मन वेडं झालंय, तुझ्या रुपाला भुललंय,
धुंद होऊन तुला मी घेतोय जवळी

ही रात्र पावसाळी, आहे आगळी
तुझ्या माझ्या मनाला करतेय खुळी
बेधुंद, बेताबीने बरसतोय हा पाऊस,
भिजवून टाकतोय तो सृष्टी सगळी

आज माझं दिल पागल झालंय, मस्तान झालंय
तुझ्या प्रेम कटाक्षाने ते वेडं झालंय, दिवान झालंय
या रातीच्या प्रहरीही, अमर्याद कोसळतोय हा पाऊस,
बोलता बोलता सखे, तुझ्या प्रेमात पIडतोय हा पाऊस

हा ऋतू असाच असतो, प्रिये, मनात प्रेमाचा ओलावा जागवतो
हा मोसम असाच बहरत असतो, जीवाला शांत, थंड करत असतो
हा सावन प्रेम घेऊन येतो, प्रेम वर्षवित येतो, प्रेम वाटत येतो,
हा पाऊस सर्वां एक करतो, साऱ्यांची मने जिंकतो, साऱ्यांना प्रेमात पडतो

हा पाऊस पडतI पडतI रापलेल्या सृष्टीला नवलाई, नव्हाळी देतो
हा पाऊस रुक्ष वृक्षांना, पानगळ पर्णराईला, पाने फुले वाटतो
प्रथम पडतI, मृत्तिका गर्भातून, खुशबू, सुगंध वाटत फिरतो,
सर्व ऋतूंचा राजाच हा पाऊस, हिरव्या रंगाने तो निसर्ग नटवतो

हा पाऊस बरसतI बरसतI, पडतI पडतI सार्यांना भुलवत असतो
हा पाऊस त्याचे जलामृत बरसवीत सार्यांना खुलवत असतो
हा पाऊस आपल्या जलधारांतुन सारीकडे आनंद पसरवत असतो,
हा जीवन दातI पाऊस, आपल्या थेंबांतून सर्वांना जीवन वाटत असतो

ही रात्र पावसाळी, आहे आगळी
तुझ्या माझ्या मनाला करतेय खुळी
तुझ्या प्रीतीचा स्वाद मनाला भावतोय,
रस-ग्रहण करतोय मी ही प्रेमानंदाची गोळी

ही रात्र पावसाळी, आहे आगळी
तुझ्या माझ्या मनाला करतेय खुळी
हा पाऊस पडतIना किती सुंदर दिसतोय,
अनोख्या रूपात लखलखतेय ही रात्र काळी-सावळी 

हा पाऊस दुःखित मनाला सुकून देतो, व्यथा दूर करतो
गर्म घर्मधारांना आपल्या शीत जलधारांनी शांत करतो
बेकरार मनाची बेकरारी स्वतः घेऊन तो मनाला करार देतो,
तडपत्यI, तरसत्या, तळमळत्या मनIस तो प्रेमाचे आंदण देतो

या पावसाने तुझ्यावर जणू जादूच केलीय, प्रिये, मोहिनी घातलीय
पडतI पडतI त्याने तुझी नजरच बांधून टाकलीय, तू एकटक पहIतच राहिलीस
ना तुला तुझं स्वतःचं भान, ना परिस्थितीचं, तू जलधारांमध्येच अडकलीस, 
असं काय आहे या पावसात, की तू तुझ्या प्रियकरालाही विसरलीस ?

तुझे मोकळे केस वाऱ्यावर उडताहेत, तुझ्या बटा गालांवर रुळताहेत
तुझा पदर वाऱ्यावर मुक्त लहरतोय, तुझी साडी पाऊस चिंब भिजवतोय
भान कुठे आहे तुझं, लक्ष कुठे आहे तुझं, मी तुला नाना परीने खुणावतोय,
भानावर ये, सखे, या पावसाने तुला खुळ केलंय, पाऊस जणू तुझं अस्तीत्वच हिरIवतोय

या पावसाने आपणI दोघांत एक जवळीक निर्मण केलीय,आपुलकी वाढवलीय
या पावसाने दोन प्रेमी जीवांना एक केलंय, प्रीतीची नवीन दृष्टी दिलीय
या पावसाच्या पडण्याला काही अर्थ आहे, तो निरर्थक पडत नाहीय,
आपली जोडी बहुतेक त्याला आवडलीय, त्याची आपल्यावर इतराजी झालीय

ही रात्र पावसाळी, आहे आगळी
तुझ्या माझ्या मनाला करतेय खुळी
प्रेमाला आपल्या एक रूप देतोय तो,
अन वर्धित करतोय आपल्या प्रेमाची झळाळी

ही रात्र पावसाळी, आहे आगळी
तुझ्या माझ्या मनाला करतेय खुळी
पाऊस पडतI अनेक रूपे आकर्षित करतोय,
लहरी उन्मादाच्या जलधारांच्या, मनामनात आंदोळी

पाहता पाहता या संथ पावसाचा जोर वाढलाय, वेग वाढलाय
पाहता पाहता हा निसर्गाचा दूत, जलाचा देवदूत, मुसळधार कोसळू लागलाय
एक तेही रूप त्याचे शांत, सौम्य, मंद, संतत धारामध्ये वहIत असलेले,
एक हेही रूप त्याचे रौद्र, भीषण, कराल, विकराल वादळात लपलेले 

असं वाटतंय या वादळात, या तुफानात कुठच्याकुठे भिरकावले जाऊ
असं वाटतंय या हलकल्लोळात आपले कोणते अस्तीत्व टिकवून ठेवू ?
किती महान आहे हा निसर्ग, किती लहान आहे हा मानव त्याजपुढे,
या अफाट, अमर्याद शक्तीपुढे, मर्यादित असा अहंभाव घेऊन कितीसे टिकून राहू ?

हा पाऊस काहीसा अजब भासू लागलाय, आभाळी भिरभिरू लागलाय
भिरभिरत जणू त्याने वादळी रूप घेतलंय, वावटळीच्या स्वरूपात बदलू लागलाय
आकाशी कृष्ण घटI स्वैर पसरू लागलीय, अंबरास झाकू, झाकोळू लागलीय,
ढगांच्या कडकडाटात, विद्युलताही नाचू लागलीय, काडकन चमकू लागलीय

पावसाचे हे सारे प्रताप आपल्या दोघांची धडकन वाढवताहेत
पावसाचे हे सारे उपद्व्याप आपल्या दोघांना जवळ आणताहेत
आज हा पाऊस खुळ्यासारखाच ओततोय, त्याला नाही अंत ना पार,
आम्हालाही त्याने प्रेमात खुळ केलंय, मनात आहे फक्त प्रेमाचाच विचार

ही रात्र पावसाळी, आहे आगळी
तुझ्या माझ्या मनाला करतेय खुळी
आगच लावलीय या पावसाने सर्वांगास,
शीत जल त्याचे जणू अंग अंग जाळी

ही रात्र पावसाळी, आहे आगळी
तुझ्या माझ्या मनाला करतेय खुळी
या रातीची बातच आहे काही वेगळी,
तुझ्या मिठीतच घालवायचीय मला ही रात्र सगळी

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2023-रविवार.
=========================================


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):