चौकट
दिवस होते फुलपंखी स्वप्नात रमण्याचे
रंगवले होते स्वप्न मीही रसिक साजणाचे
झाली पहिली भेट जेव्हा आपली दोघांची
मनीच्या चौकटीत जागा तुझ्या तसबिरीची
एकमेकांची जशी ओळख पटत गेली
तसबीर तुझी चौकटीतून निसटत गेली
पाहत राहिले वाट रंग गहिरे होण्याची
होत राहिली तसबीर धूसरच रंगाची
सांभाळत राहण्यापेक्षा तस्बीर चौकटीविना
सोपे ना सांभाळणे चौकटच तस्बिरीविना--!
--------------