टिपूस
लहान बाळाच्या टपोऱ्या डोळ्यातले
दोन टिपूस म्हणजे त्याचे अबोल शब्द
आकाश आणि जमीन कोरडी असतांना
दोन टिपूस म्हणजे प्राक्तनाचा आक्रोश
गुंतलेल्या मनांचे हाथ दूर जातांना
दोन टिपूस म्हणजे हृदयातला प्रेमरस
ठीक आहेस ना, हक्कानी विचारता कोणी
दोन टिपूस म्हणजे माहेरचा गोडवा
मुलांच्या झेपेत आपली स्वप्ने बघतांना
दोन टिपूस म्हणजे अभिमानाची पावती
कला बघता, मन गदगदून जातांना
दोन टिपूस म्हणजे भावनांची जोडणी
हुदयाच्या तुकड्याची पाठवणी करतांना
दोन टिपूस म्हणजे आशीर्वादाची शिदोरी
वय कितीही असो, क्षण कडू गोड असो
दोन टिपूस म्हणजे माणूस असण्याची शाश्वती