"सांग ना, ए चिऊ"
ए चिऊ , तू माझ्या सोबत उडशील का ?
ए चिऊ , तू माझ्या सोबत उडशील का ?
तू माझ्या ग घरट्यात राहशील का ?
माझ्या घरट्यात कापसाची गादी मऊ मऊ
आणून देईन मी तुला ज्वारी आणि गहू
गच्चीवरचे दाणे आपण सोबतच खाऊ
ए चिऊ , तू माझ्या सोबत उडशील का ? || 1 ||
दररोज सकाळी आपण उडायला जाऊ
ओढ्याचे पाणी आपल्या चोचीने पिऊ
संध्याकाळी वापस पिल्लांपाशी येऊ
ए चिऊ , तू माझ्या सोबत उडशील का ? || 2 ||
मग हिवाळ्यात आपण गम्मत जम्मत करू
पिलांना आपल्या आपण उडायला शिकवू
सगळे मिळून मग आपण सुखाने जगू
ए चिऊ , तू माझ्या सोबत उडशील का ? || 3 ||
-स्वप्नील वायचळ