"नाते प्रेमाचे"
तुझे नि माझे प्रेमाचे नाते
प्रेमात हृदय गुंतून जाते
संगती तुझ्या नाचे मन माझे
वाऱ्यासंगे जसे गवताचे पाते
नजरेत तुझ्या अजबच जादू
नेत्रांनी हृदयाचा संवाद साधू
स्पर्शाने तुझ्या मोहरून जाई
हृदयात हर्षाचा संचार होई
मिठीत तुझ्या स्वर्गच भासे
कळीला उमलवी दवबिंदू जसे
नात्यात सर्वोच्च नाते प्रेमाचे
तुझे नि माझे सात जन्माचे
-स्वप्नील वायचळ