माझं भांडण नाहीये तुझ्याशी...
माझा वाद आहे माझ्यातल्या तुझ्याशी...अन तुझातल्या माझ्याशी...
एवढं का हरवून जावं एकमेकात..
कि विसरून जावं स्वतःच अस्तित्व..
विसरावं माझं मी असणं...आणि तुझं तू....
एवढं का सोबत असाव एकमेकांच्या..
कि कविता करावी मी...पण लोकांनी शोधावं त्यात तुला...
रडावं तू...आणि कलंक मात्र माझ्या माथ्याला...
असं का व्हावं...
कि प्रवासात एकत्र तर असू आपण...पण मनाने मात्र दुसरीकडेच खेळावं...
ओठावर जरी असेन हसू....डोळ्यात काहीतरी वेगळच दिसावं..
हाथात हाथ असावा...पण पाय मात्र विरूद्धच पडावेत...
जणू काही मंदिर तर बांधलय आता...पण विराजमान व्हायला देवच तयार नसावेत..
म्हणून तुला सांगतोय..
जरा अनुभवू तर नशा....
बंद डोळ्यांनी जागायची...
जरा बघू तर गम्मत....
काही तरी मिळवण्यापेक्षा....बरंच काही हरवायची..
अन सगळं काही हरवून...थोडं फार कमवायची...
बस झालं फक्त एकमेकासाठी जगणं..आता जगूया जरा स्वतः साठीही...
आणि स्वतःसाठी जगताना...थोडी ओळखपण वाढवूया आपल्या नात्याची...
-------विजय दिलवाले...