स्पर्श तुझ्या शब्दांचा . मला कधी ना जाणवला.
वाट बघता बघता. प्रत्येक क्षण निसटला.
तुझ्या प्रेमाचे शब्द ऐकायला. प्राणाचे मी कान केले
पण तुझ्या शब्दांसाठी. माझे तर प्राणच गेले
स्पर्श तुझ्या शब्दांचा जाणवायला. कडाही डोळ्यांच्या पानावल्या
आताच्या तुझ्या कोरड्या वागण्याने. भावना सार्या जळून गेल्या.
असे वाटते माझ्यासाठी. रोज रडते आकाश.
कधी वाटते सगळे सोडून द्यावे. तोडून टाकावे सारे पाश.
आयुष्य सारे जळून गेले. जीवनाची झाली स्मशानभूमी
तुझ्या मेलेल्या संवेदना. जागवायाला तूच संग आता काय करू मी
किती फरफट होते जीवाची. कुठवर सहन करायची मी
तुझ्या प्रेमाची वाट बघत. वर्षे अशीच सरयाची....