डोळ्यांच्या त्या पलीकडे
एक वेगळे असे जग आहे
वेगळ्या त्या जगामध्ये
खूप सारे स्वप्न आहे
प्रत्येक स्वप्न कसे
ओळीने उभे आहे
आपला नंबर येण्याची
प्रत्येकजण वाट पाहत आहे
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे
या साठी तुही झगडत आहे
तुझ हे झगडन पाहून
आता मी हि घाई करत आहे
एक एक स्वप्न कसे
पुढे पुढे सरकत आहे
त्या मध्ये माझे स्वप्न
डोक वर करून तुला खुणवत आहे .
डोळ्यांच्या त्या पलीकडले
जग कितीना सुंदर आहे .....
नकाराच्या त्या प्रत्येक गोष्टी
होकारार्थी तो बनवत आहे .
डोळ्यांच्या त्या पलीकडले जग.....
चेतन र राजगुरु