परी
आयुष्यात कुठून तरी एक परी येते
कुठे तरी आतमध्ये गोड कळी खुलते
जुन्या मित्रांपेक्षा ती हवीहवीशी वाटते
दिवस रात्र मनामध्ये घालमेल घालते
येण्याने तिच्या जणू आयुष्यच बदलते
नकळत चेहेऱ्यावरती सुहास्य झळकते
नेहेमीच्या कामामध्ये लक्ष नाही लागते
येत जाता प्रत्येक पोरीत तीच दिसू लागते
जिकडे ती जाईल तिकडे मान का ती वाकते
गोड तिच्या हास्याला बघत राहावेसे वाटते
गालावरती रेंगाळणारे केस जेव्हा सावरते
गुदगुल्या झाल्यासारखे मला का ते वाटते
आयुष्यात कुठून तरी एक परी येते
येण्याने तिच्या जणू आयुष्यच बदलते
-स्वप्नील वायचळ