तू मधुर
तुझे रूप मधुर
तुझे बोलणे मोहक
माझ्याचसाठी म्हणून आलीस
मीच तुझा जालो
इतकी कोमल
परन्तु अमर्याद सामर्थ्य
इतकी मृदुलता
परन्तु पर्वताची अभेद्यता
इतकी नम्रता
परन्तु तुझ्याशिवाय पानही
हालत नाही
तू तर साक्षात्
प्रसन्नतेची मूर्ति
ज्यावर प्रसन्न होशील
ते तूच होतेस
प्रिये मला क्षमा कर
आज पर्यंत तुला ओळखलंच नाही