तुजविण सख्या रे..
बावरलेल्या सायंकाळी
बसून होते उदास, गुपचूप
पडली होती सोनकिरणे
पण, कोमेजून गेले होते रूप
आतुरलेल्या नयनांमध्ये
तुझीच रे होती प्रतीक्षा
क्षणा-क्षणाला तुटला जीव
जणू घेत होते माझी परीक्षा
रंगवलेल्या नभात निळ्या
मेघ शहाणे फिरत होते
अन मीच वेडी, वेड्या मनात
कसले बहाणे फिरत होते
अशाच एका सायंकाळी
अलगद तुझ्या कुशीत येऊन
सोडून द्यावे माझे 'मी'पण
नि कायम राहावी तुलाच बिलगून
तुजविण सख्या रे..
या कातरवेळी मी घाबरते
स्तब्ध झाला हा देह जरी
नयनांतून पाणी झरते....
--जय