II ओम साई II
रुसवा
कोण हा खल रुसवा,ज्याने तुला केलीस अबोल,
किती कंजूस ते ओठ,ज्यांच्या हसण्यातही नाप तोल;
केवढा जड तो राग,जो जीव शालीस पाडतो झोल,
नकोस गं अशा पापण्या ओलावू,ते अश्रू आहेत अनमोल.
मनवायचा तुला प्रत्येक प्रयास का घालवतेस फोल,
अशी मान वळवू नकोस,पाहिजे तर मला पाठी सोल;
एकदा तर गं या सुन्या छातीवर विसावून डोल,
नकोस गं अशा पापण्या ओलावू,ते अश्रू आहेत अनमोल.
मी आणि माझ्या चुकांना,पदराच्या उबेत ठेवीन होतेना तुझेच बोल,
एकदा तर गं शिरू दे त्या पदरी,काहीच का नाही माझ्या जवळिकीस मोल;
का खपलीस येऊन सुकावली,मला चीम्बवणारी त्या दवीत प्रेमाची ओल,
नकोस गं अशा पापण्या ओलावू,ते अश्रू आहेत अनमोल.
टोकावलीस,तरी जवळायचं आहे का कि हा सरळ राग आहेच मूळचा वाकता गोल,
धरणी अम्बरापरी अंतरावलीस,तरी कशी विसरशील तो प्रेमाचा ऐतिहासिक भूगोल;
किती हा टोकाचा राग,ज्याचा शिगेनेच जीव जातो खोल;
नकोस गं अशा पापण्या ओलावू,ते अश्रू आहेत अनमोल.
चारुदत्त अघोर.(दि.१४/१/११)