Author Topic: तुझी आणि माझी ती पहिली भेट  (Read 2590 times)

Offline vijayvitkar

  • Newbie
  • *
  • Posts: 8
 :-*तुझी आणि माझी ती पहिली भेट
मी विसरू शकणार नाही
तुझ्या डोळ्यातील भीती
मी विसरू शकणार नाही
तुझा तो पहिला स्पर्श   
मी विसरू शकणार नाही
तुझ्या मिठीतील ती उब
मी विसरू शकणार नाही
तुझ्या केसांचा तो गंध
मी विसरू शकणार नाही
तुझ्या गालावरची लाली
मी विसरू शकणार नाही
तुझ्या ओठांचा गोडवा 
मी विसरू शकणार नाही'
आणि तू तरी कशी विसरशील ?