मानस दरवळले
तू झटकित जाता रेशीमकुंतल काळे
ती शुभ्र जुईची धुळीत पडली फुले
वेचून तयांना ओंजळीत मी धरिले
त्या मत्त सुगंधे मन धुंदावुनी गेले
नुपूर चरणी गे रुणझुणता चंचले
त्या मंजुळ नादे मन हे वेडे झाले
गे काजळ भरले नेत्र तुवा रेखिले
ते नयनबाण घायाळ करोनी गेले
किती दिसांनी नयन आज ते लज्जेने झुकले
लक्ष चांदण्या मनी उजळता मानस दरवळले
-------------