ज्योत
अंधाराला मी घाबरत नाही, दाही दिश्या उजळून टाकीन.
सेवेसाठी सदैव तत्पर ज्योत माझी तुझ्यासाठी तैवत ठेवीन.
आनंदेल सारी सृष्ठी अस्मान सारे आनंदाने चीत्कारेल.
मार्गक्रमन करीत राहा संकटाला घाबरू नकोस .
यशस्वी तू नक्कीच होशील धीर मात्र तू सोडू नकोस.
आलाच कोळोख तुझ्या वाटेला ज्योत माझी प्रकाश पसरत जाईल.
अखंडपणे नथकता मार्गपरीक्रमण करीत रहाशील का ?
अंधारातून वाट काढण्या तू प्रकाश माझा घेशील का ?