अशी का रुसलिस गं साजणे
मागण्या उगाच आभूषणे
गोड रूप तव लोभसवाणे
हवी कशाला तुज प्रसाधने
भाव मनीचा मुग्ध मोकळा
प्रतिबिंबित हो तुझ्या डोळा
काजळरेषा हवी कशाला
तेज त्याविण मोहवी मला
नको चंदनी लेप तनूवर
कोमल काया प्रमुदित अंतर
प्रेमप्रभा पसरता मुखावर
रूपवैभवे उजळे परिसर
स्वर्गातुन उतरल्या भूवर
नको अप्सरा रंभा सुंदर
रमाच माझी प्रिया निरंतर
रमाच माझी प्रिया निरंतर
-----------