ओम साई
डोळ कडा
आयुष्याचे किती टप्पे गाठ्लेत हे नाही आठवत,
आठवणी हृदयी रुजतात,त्यांना नाही कोणी साठवत,
तरुण्यीत टप्पोरी काळी जरी फुल झाली,तरी पाकळ्या नाही गळत,
भिजले डोळे थोडे कोरडले,तरी पापण्या नाही लवत....
कारण..कारण वाटतं.....
पुढल्या टप्पित आयुष्याचं प्रवासी गाडं,तुझ्याच सोबतीनं हाकलावं,
नकळतच रुजलेल्या आठवणींचं पुस्तक तुझ्याच हातून उकलावं,
अनुभवाच्या मातीतलं हे अगळ फुल तू वेणीत गुंफाव ,
कोरड्लेल्या डोळ्काडांना,फक्त तुलाच पाहून भिजवावं......
चारुदत्त अघोर.(दि.१०/१२/१०)