कधी आई होऊन मायेने जवळ घेतलेस मला
तुझ्या उबदार कुशीत आनंद दिलास सार्या जगातला
कधी शिक्षक होऊन सांगितलेस, "उतरू नकोस, चढ"...
पाठीवर विश्वासाची थाप मारलीस आणि म्हणालास, "लढ"
कधी माझा मित्र झालास, मैत्रीपुढे मला पार झुकवलंस
तुझ्या डोळ्यांनी मला जगाकडे पहायला शिकवलंस
आज कसं सांगू तुला माझ्या मनी भाव काय?
आज उमललेल्या या नात्याचे नाव काय?
- गोजिरी