सुख ओसंडून वाहे, भाव दाटले हे ओठी
हळूवार गुंफल्या या नाजूक रेशीमगाठी
आज मोकळे आभाळ पण भरलेले मन
सूर्य लपे तो मेघांत तरी कोवळे ते ऊन
शब्द सापडे ना काही झाली भावनांची दाटी
हळूवार गुंफल्या या नाजूक रेशीमगाठी
काही बोललेच नाही, तरी किती मी बोलले
मनाचिया झोक्यावर आज किती मी झुलले
माझे डोळे मी वाटेला लावलेत कोणासाठी?
हळूवार गुंफल्या या नाजूक रेशीमगाठी