14/2/2011
पोरकी कविता
माझ्या पोरक्या कवितेला कुणी तरी कडेवर घेईल का
तिचे रडणे कुणी तरी ऐकेल का
तिची भूख कुणी तरी शमवेल का
आहे कुणी असा जो तिला प्रेम देईल ?
माझ्या कवितेला कुणी गाणारा भेटेल का
सुरांची सजावट घेऊन कुणी तरी येईल का
कुणी संगीत बद्ध तिला करेल का
का मग ती अशीच मोकाट वार्यावर वहात जाईल
एखाद्या तुटलेल्या पतंगा प्रमाणे हेलकावे खात
"आज व्ह्यालेनटाइन डे ", देईल का मला कुणी फुल ना फुलाची पाकळी
आतुरतेने वाट पाहणारी
तुमची पोरकी कविता
अशोक प्रधान