ओम साई
सांग,खरंच आता मी काय बोलू?
आपला हट्ट तू कधी सोडत नाही,
पाठी ताठा कधी मोडत नाही;
तुझ्या जीद्दी पणास मोडता कसा घालू,
सांग,खरंच आता मी काय बोलू?
माझा मनाचा ओलावा तुला भिजवत नाही,
कि तू माझी पण डाळच,म्हणून शिजवत नाही;
या बालिश पणास आडता कसा घालू,
सांग,खरंच आता मी काय बोलू?
वर हट्ट धरतेस कि मीच चूप बसलो,
स्वतःतच घुसमटतेस,जर मी नसलो,
तुझ्यात शिरण्याकरिता किती घिरट्या घालू,
सांग,खरंच आता मी काय बोलू?
रागवतेस माझ्यावर जर उशिरानं आलो,
ओढून बसवतेस,जर उठायला गेलो;
या विक्षिप्त पणाला कसा आळा घालू,
सांग,खरंच आता मी काय बोलू?
छाती बटणं उघडतेस,जर लावायला गेलो,
गवती कुर्वाळतेस,जर झाकायला गेलो;
या उगवत्या काट्यांना कसा दाबता घालू,
सांग,खरंच आता मी काय बोलू?
मान माझी फिरली तर,हनवटून जवळतेस,
हलके शब्द कुजबुजायला ओढून कान पीळवतेस;
या सरसरत्या शब्दांना कसा गं उडता घालू,
सांग,खरंच आता मी काय बोलू?
केशी बोटं गुंतवून,लटीस माझ्या ओढ्तेस,
दुखाऊन 'आ' केलं तर बाहूत आपल्या वेढ्तेस;
या शाहार्त्या मनाला कसा उबता घालू,
सांग,खरंच आता मी काय बोलू?
चिडून झटकलं तर,हाथ विळखावतेस,
कोणता रानटी लाड, कि नखं शिळखावतेस;
या आगळ्याच लाडिकपणाला कसा पाठी घालू,
सांग,खरंच आता मी काय बोलू?
घड्याळ्याचा काटा तासनं मागावतेस,
गजरा मीच मळावा,म्हणून त्रागावतेस;
या प्रणयी मनोर्या भिंतीत कसा गं खिळा घालू,
सांग,खरंच आता मी काय बोलू?
स्वतःस आवरलं तर युक्ती प्रणय वाढवतेस,
वादळून झेपावलं तर पळून आडवतेस,
आगी भडकल्या हृदयास कसा वारा घालू,
सांग,खरंच आता मी काय बोलू?
आपल्या चंद्रकोरी बाहूत,कधी खेचून झुलावतेस,
ते कळीरुपी क्षण,अधिकच फुलावतेस;
या पसरल्या कोवळ्या रानास,कोणत्या तारा घालू?
सांग,खरंच आता मी काय बोलू?
चारुदत्त अघोर.
(दि.१५/२/११)