झंकार त्या पैजणांचा ,
कानी अजुनी येतो,
होकार त्या बनातला ,
कानी अजुनी येतो ,
आज न जरी काही
उरले सांगावया ,
आवाज त्या मनाचा ,
कानी अजून येतो
झंकार त्या पैजणांचा ,
कानी अजून येतो,
दिस जरी मावळला ,
त्या आड जंगलामधी,
फुत्कार त्या श्वासांचा ,
कानी अजुनी येतो,
झंकार त्या पैजणांचा ,
कानी अजून येतो,
लोटला काळ कितीतरी,
ते पावसात भिजल्यावरी,
आवाज थरारत्या ओठांचा ,
कानी अजुनी येतो,
झंकार त्या पैजणांचा ,
कानी अजून येतो,
आज जरी त्या आठवणी ,
सोबतीला माझिया सखये,
नकार तो शेवटचा तुझा,
कानी अजुनी येतो,
झंकार त्या पैजणांचा ,
कानी अजून येतो,
:)फिरोज मिर्झा....