!! प्रेम हे प्रेम असते !!
कधी आई साठी तर कधी वडिलांसाठी,
कधी भावासाठी तर कधी बहिणी साठी,
कधी प्रेयसी साठी तर कधी आयुष्याच्या जोडीदारा साठी,
कधी मैत्रींणी साठी तर कधी मित्रांसाठी,
कधी नात्यासाठी तर कधी नाते नसतानाही
प्रेम हे प्रेम असते,
प्रेमासारखे आयुष्यात सुंदर असे दुसरे काहीही नसते,
प्रेम हे प्रेम असते !! प्रेम हे प्रेम असते !!
कधी भावनांनी व्यक्त होते,
तर कधी स्पर्शाने, कधी मुकेपणातही प्रेम असते,
तर कधी बोलुनही व्यक्त होते,
कधी प्रेमानेही प्रेम कळते,
तर कधी रागातही प्रेम असते,
ज्याला समजले त्याला जमले,
कधी लक्ष देऊनही करता येते,
तर कधी दुर्लक्षातही असीम प्रेम असते !
प्रेम हे प्रेम असते.