Author Topic: एक जीर्ण आठवणींच पान.  (Read 2168 times)

Offline charudutta_090

 • Jr. Member
 • **
 • Posts: 185
 • Gender: Male
 • A fall leaf of autumn,....!!
एक जीर्ण आठवणींच पान.
« on: February 22, 2011, 07:15:55 AM »
ओम साई
एक जीर्ण आठवणींच पान.
आठवतं तुला आपण मेटीनीला गेलेलो?,
मी ऑफिसला दांडी मारून हाफत आलेलो,
घरच्याच अवतारात बाहेर पडलेलो विसरून देहभान,
तिकीट मिळायची धडपड ती मोडेस्तोवर मान,
शो संपताच बाहेर त्याच वेळेस पाऊस आला घ्यायला,
कोपर्यातल्या टपरीवर आल्याचा गरम चहा होता प्यायला,
छत्री नसता रिक्षेत बसलो थोडं कोरडं पण खूप भिजलेलं,
घरी येताच तू माझं डोकं तुझ्या पदरानं पुसलेलं,
खूप वर्षा नंतर आजचा पाऊस तसाच भासला,म्हणून बेभान मन स्वैर नाचलं,
जीर्ण आठवणींच्या पुस्तकाचं,आज एक पुसट पान वाचलं....!!!
चारुदत्त अघोर.(दि.४/१२/१०)


Marathi Kavita : मराठी कविता


Offline sujataghare

 • Newbie
 • *
 • Posts: 20
Re: एक जीर्ण आठवणींच पान.
« Reply #1 on: February 22, 2011, 09:27:51 AM »
sahi... :) :) :)

Offline sulu

 • Newbie
 • *
 • Posts: 17
Re: एक जीर्ण आठवणींच पान.
« Reply #2 on: February 25, 2011, 08:06:12 AM »
Must................................