शब्दात कसा सांगू , तुला मी कसा पाहू...
जाणार आहे दूर गावी , मनाला कसा मी समजवू ...
मन माझ पळत , तुच्या अवती भवती फिरत ....
तुझ्या ह्या बोलण्यात मग्न होऊन जात ....
चालता चालता हळूच तुज हसून माझ्या कडे पाहन...
तुझ्या या आठवणी ने , मनाला कसा मी समजवू ...
ज्हेवा साडी घालून तू येते , तेह्वा काळजात घुसते...
काय सांगू तुला , जीव गेला तरी चालेल पण या जखमा तरी कश्याला देतेस...
तुझ्या या जखमा कसा मी सहन करू ..
सांग या येड्या ,मनाला कसा मी समजवू ...
तुझ्या बरोबर चालताना , तुज हाथ हाथी घ्यावासा वाटत..
तुझ्या उडत्या खुल्या केसांमध्ये , हळूच खेळावास वाटत...
मैत्रीच्या प्रेमाची भाषा , कोणी तरी सांगावस वाटत'...
तुझ्या बरोबर असताना , प्रेमाच्या दोन गोष्टी बोलावस वाटत...
खंत एकच , भीती एकच , तुला राग येण्याची ...
तुझ्या मैत्रीत गुंतलेल्या या ,मनाला कसा मी समजवू... - सचिन तळे