तुझा चेहरा, मनाचा आरसा
निर्मळ, चंचल, अवखळसा
लकाकतो अंधारात जणू
पौर्णिमेचा चन्द्र जसा,
जगण्याशी तुझं नातं अतूट
हसणं , आनंदाची लयलूट,
त्यावर साज चढ़वितो
कुरळ्या केसांचा मुकुट
पण उगाच बोलत नाहीत ते
शब्दांवर डोलत नाहीत ते,
तुझ्या दोन डोळ्यांचे डोह
कसा आवरावा तुझा मोह?
मी गोफ शब्दांचे गुंफतो
मनाला शब्दांशी जुंपतो
पण सुटतच नाही तो
कसा आवरावा तुझा मोह?
- जय