“ॐ साईं
“घरपण”
कशी विसरणार त्या गोड दिवसाची आठवण ,
तू जुळ्लीस जीवनास,त्या सुखद क्षणांची साठवण;
नाही तर हे आयुष्य काय,होते जसे खडकावरची सरपण,
तुझ्याविना घराला,कसले ग घरपण?
तुझ्यात प्रतिबिंबित मी,जणू तूच माझं आरस-दर्पण,
स्वकुटूम्बित आधीच मी,तूच सर्वस्व त्यागून झालीस अर्पण;
मोहरावतं तुला बघताच,माझं रसाळ नरपण,
तुझ्याविना घराला,कसले ग घरपण?
रात्र वाटते जणू,निळं शिंपित तारांगण,
संकुचित स्वभाव धरणीस,केलं मोकळं मुक्तांगण;
मोठवलं इवल्या जगास,तोडून तत्व-तारीत कुंपण,
तुझ्याविना घराला,कसले ग घरपण?
मोकळावला श्वास,जो होता खडकरूपी दडपण,
मिसळवून लोकात, खुलावलेस माझे आडपण;
गोडावून स्वभाव,दुरित केलं,वृत्तीत-द्वाड्पण,
तुझ्याविना घराला, कसले ग घरपण?
जवळावलं आयुष्य जे वाटायचं लांबण,
हेल्कावीत जीवन,होते जे तलवारी टांगण;
बांधलंस सौन्सार दारी,तुझं "स्व"-रुपी तोरण,
तुझ्याविना घराला, कसले ग घरपण?
उतावळ्या चंचल मनास,ताबवलेस लगामून धोरण,
ठीणगावलीस माझी जीवनाची, जंग-पडीत ऐरण;
कोरड्या शुष्क उन्ही,दिलंस तुझं सावलीत गारपण,
तुझ्याविना घराला, कसले ग घरपण?
चारुदत्त अघोर.(२७/२/११)