होळी
कित्येक वर्षे झाली
होळी खेळलोच नाही
तुझ लग्न झाल्यापासून...............
...तुझ्या शिवाय दुसरीला
रंग लावावा अस
वाटलाच नाही कधी मनापासून .............
रंग खेळण
तर बहाणा असायचा
वाटायचं एक दिवस तरी
दूर कस राहायचं तुझ्यापासून ................
रंगाचा मोह मला कधीच नव्हता
कारण माझ्या जीवनात
रंग भरायला सुरुवातच
झाली होती तुझ्यापासून ...........
मला रंगीन करून
माझ्या जीवनाला
बेरंग करून तू
गेलीस दूर माझ्यापासून ............
तरीही प्रत्येक होळीला
तू लाडाने मला विचारतेस
राजा का पळतोस
दूर रंगापासून .............
भिवू नकोस
मिच आता भरणार
रंग माझ्या जीवनात
ह्या होळीपासून ............
कवी
निलेश बामणे