आवडले मज
आवडले मज गुलाबी ओठ
कोणाचे ते गोजिरे गाल ……….
आवडले मज काळसर केस
कोणाचे ते नाजूक हात ………..
आवडले मज मुख मनमोहक
कोणाचे ते लाजणे गोड ………….
आवडले मज छान चालणे
कोणाचे ते मधुरच गाणे ………….
आवडले मज हळूच रुसणे
कोणाचे ते भांड भांडणे ………….
आवडले मज वळून बघणे
कोणाचे ते मला टाळणे …………
आवडले मज डोळे नाशिले
कोणाचे ते दात पांढरे ………..
आवडले मज मला सोडणे
कोणाचे ते जगात एकटे …………
कवी
निलेश बामणे