समर्थक
प्रेमाच्या दिवसाचा नाही
मी प्रेमाचा समर्थक आहे .....
प्रेमात लपलेल्या प्रचंड
ताकदीचा समर्थक आहे ........
प्रेमाने जगात घडविलेल्या
क्रांतिचा समर्थक आहे ........
प्रेमात लपलेल्या प्रेमळ
कवितांचा समर्थक आहे .......
प्रेमाने प्रेमिकांना दिलेल्या
ध्येयाचा समर्थक आहे ........
प्रेमामुळे समाजात होणाऱ्या
बंडाचा समर्थक आहे .......
प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या
प्रेमिकांचा समर्थक आहे ..........
प्रेमाला त्याग मानणाऱ्या
प्रत्येकाचा समर्थक आहे ...........
कवी - निलेश बामणे