ती
पाहुनी तिला वाटले मला
हळूच जवळी घेऊ आ तिला
सावरले पण वेड्या मना
डोळ्यांनी मग केल्याच खुणा
तिने झेलता हळूच त्या खुणा
घाबरलो मी माझ्याच मना
चुकून बसला तीर निशाणा
सांगू आता काय मी कुणा
जवळ जाताच म्हंटले तिजला
नव्हता माझा विचार असला
नाही आता मार्ग तुजला
हळूच म्हणाली मग ती मजला
कवी
निलेश बामणे