जडावलेले हात आणि सुजलेले डोळे
तू सांग कुठे जाऊ माझे दार कुठले?
या निळ्या पायांच्या गर्दीतून कुठे ठेवू पाय?
संध्याकाळच्या गाण्याची त्यांना किंमत काय?
निळ्या पायांचा एक समुद्र शहरभर झालाय
रस्तोरस्ती भरलाय अन् माझ्या घरात शिरलाय
तुझ्याबद्दल विचारतोय प्रश्न कसले कसले!
जडावलेले हात आणि सुजलेले डोळे
तू सांग कुठे जाऊ माझे दार कुठले?
तो अॅक्टर दिसतो मिरवत फिरतो तुझा स्पर्श जुना
सतार वरती वाजवतो तो तुझ्या जुन्या खुणा
सज्जन चेहऱ्याच्या पेन्टरच्या मनातली बाडं!
तुझी पोर्ट्रेट्स अजूनही तिथे त्याच्याकडं
दाखवण्याजोगे नाही काहीच माझ्याकडे
जडावलेले हात आणि सुजलेले डोळे
तू सांग कुठे जाऊ माझे दार कुठले?
मी तुझे संदर्भ पकडून म्हटले तुझा शोध घ्यावा
नाव कळाले, रंगही कळला, इच्छाही कळल्या
कुणी म्हणाले पूर्वेला ती दिसते या वेळी
काळ बदलला, वय सरले पण तशीच ती अजुनी
द्यावे म्हणतो उधार त्यांना माझे हे डोळे!
जडावलेले हात आणि सुजलेले डोळे
तू सांग कुठे जाऊ माझे दार कुठले?
-सुजीत