एक रमणीय संध्याकाळ रात्रीमध्ये बदलताना......
तिचा तो पहिला स्पर्श माझ्या अंगाला लाजवणारा , आणि
मी पाहताच ति लपवित तो चेहरा गोड गालात हसणारा ,
तिचं ते बोलणं तिच्या दिसण्याहूनही सुंदर होतं ,
तिचं ते तसं वागणं जणु तिच्या स्वभावातच होतं
बघता बघता मग तिची जाण्याची वेळ झाली ,
आणि मी तिला थांबवण्याचा हट्ट सुरु केला
याच जाण्याच्या - हट्टात १ तास मात्र निघून गेला ,
आता सांज - रात्रीशी गप्पा गोष्टी करत होती ......
मग मात्र मी माझा हट्ट मागे घेतला अन तिचा मार्ग मोकळा केला,
परंतु ,
काही क्षणांतच मनात आलं .....
काहीतरी बोलायचं राहून गेलं ,
मनाने तर हिम्मत बांधली होती
पण ओठांनी मोहोर खोलालीच नव्हती ...
परंतु मित्रांनो, एक वेळ नक्कीच अशी येईल
माझ्या मनातील भावना तिला बोलून जाईल
आणि त्या वेळी मात्र सांज - रात्रीशी नव्हे तर
रात्र - पहाटेशी गप्पा गोष्टी करत असेल......
अतुल देखणे