Author Topic: एखाद्याच्या येण्याने  (Read 2029 times)

Offline chetangawand

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  :) एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

की सर्व जग त्याला सुंदर दिसू लागतं.
फुलांचा सुवास त्याला प्रफुल्लित करून टाकतो,
पक्ष्यांची किलबिल जणू त्याला मधुर गाणं वाटू लागतं...
जगणे हे तर आत्ताच सुरु झाले आहे याचा आनंद मिळू लागतो.
एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

कामातील नीरसपणा जाऊन त्यात उत्साह येऊ लागतो,
काम काम न राहता तो एक खेळ आहे असे वाटू लागतं .
रात्रीच्या वेळी आकाश पाहताना एक वेगळीचं मजा येऊ लागते,
झोपल्यावर स्वप्नांच्या दुनियेत जगण्याची एक वेगळीच किमया वाटू लागते.

हे सर्व असचं घडत राहत
कारण

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......
                                                                      :- चेतन गावंड
:)
« Last Edit: March 30, 2011, 10:45:22 AM by chetangawand »

Marathi Kavita : मराठी कविता